Gunaratna Sadavartes : मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
1 नोव्हेंबरला विरोधकांच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे, याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. सदावर्तेंनी म्हणाले हा मोर्चा नसून चमकुगिरी आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या राजकीय विहिरीत काहीच नाही मग आता पोहऱ्यात कुठून येणार? असा सवाल यावेळी वकील गुणरत्न सदावर्तेंनी यांनी केला. फॅशन स्ट्रीटवर अनेक लोक असं काम करतात की त्यांचा हातावर पोट आहे, या मोर्चामुळे त्यांचं नुकसान होऊ शकत. गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहेत का? असा सवाल उपस्थित केला. पुढे ते म्हणाले मी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाणे यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे आणि हा मोर्चा होऊ द्यायचा नाही असं यावेळी सदावर्तें म्हणाले...
