Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteTeam Lokshahi

गुणरत्न सदावर्तेंच्या घरात पैसे मोजण्याचं मशीन; ST कर्मचाऱ्यांच्या पैशात घेतली गाडी, जमीन

गिरगाव कोर्टात सरकारी वकीलांनी दिली माहिती; कोल्हापूर पोलीसही ताबा मागण्यासाठी न्यायालयात हजर

मुंबई : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं (ST Workers) वकीलपत्र घेण्यासाठी सदावर्तेंनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak Attack Case) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यामध्येही त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आज मुंबईतील गिरगाव कोर्टात सुनावणी सुरु असताना सरकारी वकीलांनी कोर्टात काही गंभीर बाबी मांडल्या आहे.

Gunratna Sadavarte
ST मधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 76% कर्मचारी कामावर परतले

गिरगाव कोर्टात युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, सदावर्ते यांनी परळमध्ये 60 लाखांची जागा घेतली, भायखाळ्यामध्येही त्यांनी जागा विकत घेतली. तसंच 23 लाखांची नवी गाडी विकत घेतली असून, त्यांच्या घरात पैसे मोजण्याचं मशीन देखील सापडल्याचं सरकारी वकीलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सदावर्ते यांची आणखी चौकशी करण्यासाठी गावदेवी पोलिसांना त्यांची कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली आहे.

Gunratna Sadavarte
पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार

दरम्यान, सदावर्ते यांच्यावर कोल्हापुरमध्येही एका प्रकऱणात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षण प्रकरणात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात सदावर्तेंची कोठडी मिळावी ही मागणी घेऊन कोल्हापुर पोलीस देखील गिरगाव न्यायालयात पोहोचले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com