Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteTeam Lokshahi

सदावर्तेंना कोठडी मिळण्यासाठी सरकारी वकीलांनी असे कोणते मुद्दे कोर्टासमोर मांडले?

गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टाने आज दोन दिवसांची कोठजी सुनावली आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलीस कोठडी आज वाढवण्यात आली आहे. सिल्व्हर ओकवर (Silver Oak Attack Case) झालेल्या हल्ल्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. शनिवारप्रमाणे त्यांना आजही कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते हे स्वत: मोठे वकील असून, त्यांची पत्नी देखील वकील आहे. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणात सरकारची बाजू मांडली. त्यामुळे या प्रकरणाकडे अनेकजण उत्सुकतेनं पाहत होते. (Two Days Police Custody to Gunratna Sadavarte)

सरकारी वकीलांनी नेमका कोणता युक्तीवाद केला? कोणते मुद्दे मांडले?

  • सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर सांगितलं की, गुणरत्न सदावर्ते हे तपासाला सहकार्य करत नसल्यानं त्यांची कोठडी वाढवून द्यावी.

  • गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जो मोबाईल जप्त करण्यात आला, त्या मोबाईलमधून काही पुरावे मिळाल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. त्यांच्या सोशल मीडियावरून देखील काही पुरावे सापडले असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं.

Gunratna Sadavarte
किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार
  • या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचा संशय आहे, त्या सर्वांचा ताबा हवा असून, त्यांना शोधण्यासाठी सदावर्तेंची कोठडी हवी आहे असं वकीलांनी सांगितलं.

  • घटना घडली त्यादिवशी अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्तेंच्या संपर्कात होता. नागपुरातून सदावर्तेंना एक फोन देखील आला होता. तसंच MJT या युट्यूब चॅनलशी चंद्रकांत सुर्यवंशीही प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे. या चॅनलनेच रेकी केली होती असा संशय आहे. सध्या सुर्यवंशी फरार असल्याची माहिती मिळतेय.

  • सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेताना सांगितलं होतं की ते कुणाकडूनंही पैसे घेणार नाही. मात्र नंतर सदावर्तेंनी सर्व कर्मचाऱ्यांकडून 530 रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशा पद्धतीनं सदावर्तेंनी तब्बल दीड कोटी रुपये जमवल्याचं कोर्टात सांगण्यात आलं.

Gunratna Sadavarte
"मी पुन्हा येईन'' या नादात माझचं फोन टॅपिंग...एकनाथ खडसेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा
  • सदावर्ते यांना शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणाची सर्व माहिती होती. त्यांना आलेल्या फोनबद्दल ते माहिती देत नाहीये. ती माहिती घेण्यासाठी ते सहकार्य करत नाहीत असं सरकारी वकील म्हणाले.

एकुणच या सर्व गोष्टींच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानंतर मात्र कोर्टाने फक्त दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com