Crime SceneTeam Lokshahi
ताज्या बातम्या
पुणे हादरलं, महाराष्ट्राला काळीमा... बाप-लेकाने केला सख्ख्या आईचा खून
आरोपी संदीप हा एका राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी आहे
चंद्रशेखर भांगे | पुणे: पुण्यातील केशवनगर मुंढवा येथे स्वतःच्याच वयोवृद्ध आईला तिच्याच मुलाने आणि नातवाने कट रचून जीवे मारलं आहे. आजीच्या शरीराचे 9 तुकडे करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी मयत महीलेचा मुलगा संदीप गायकवाड ,नातू साहील गायकवाड याना अटक केलीय.
आई हरवल्याची तक्रार आरोपी संदीप याने मुंढवा पोलिस स्थानकात केली होती.परंतु बहीणीने घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आरौपी संदीप आणि साहील याने कटरच्या साह्याने तुकडे करत जवळील मुठा नदीत फेकले होते.या धक्कादायक प्रकरणा नंतर परीसरात खळबळ उडाली आहे. आरोपी संदीप हा एका राजकीय पक्षाच्या संबंधित पदाधिकारी असल्याचे वृत्तही समोर येत आहे.