तर भाजपाचे अर्धे नेते तुरुंगात जातील; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

तर भाजपाचे अर्धे नेते तुरुंगात जातील; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपावर केजरीवाल यांनी चांगलीच टीका केली आहे. केजरीवाल म्हणाले की, . “मला सीबीआय, ईडीवर एक दिवसासाठी नियंत्रण दिल्यास भाजपाचे अर्धे नेते तुरुंगात जातील”,एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, दिल्ली महापालिकेची निवडणूक आप जिंकेल,एकूण २५० जागांपैकी ‘आप’ला २३० हून अधिक जागा मिळतील. या निवडणुकीत भाजपाला केवळ २० जागा मिळतील. असे देखिल केजरीवाल म्हणाले आहेत.

“गेल्या सात वर्षांमध्ये त्यांनी (भाजपा) आप नेत्यांवर १६७ खटले दाखल केले आहेत. मात्र, एकाही खटल्यातील आरोप ते न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. १५० हून अधिक खटल्यांमधून आप नेते दोषमुक्त झाले आहेत. तर ऊर्वरित खटले प्रलंबित आहेत. तपास यंत्रणेच्या ८०० अधिकाऱ्यांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत तपास करण्यात आला. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही. या यंत्रणांनी आपविरोधात खोटे खटले दाखल केल्यामुळे त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com