Happy New Year 2026 Wishes In Marathi : इंग्रजी नवीन वर्षाच्या मराठीत द्या शुभेच्छा, पाहा खास मेसेजेस

Happy New Year 2026 Wishes In Marathi : इंग्रजी नवीन वर्षाच्या मराठीत द्या शुभेच्छा, पाहा खास मेसेजेस

Happy New Year 2026 Wishes In Marathi: नवीन वर्ष 2026 च्या निमित्ताने, तुम्ही या सुंदर शायरीच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

नव्या कल्पनांचे मनोरे रचुया,

नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया,

नवे वर्ष आहे नव्याने आलेले,

नवे रंग उधळून स्वागत करुया.

पुन्हा एक नविन वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला,

पुन्हा एक नवी दिशा.

नव्या या वर्षात ...

संकल्प करुया साधा,

सरळ आणि सोप्पा...

दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया

ह्रदयाचा एक छोटासा कप्पा..

गतवर्षीच्या …

फुलाच्या पाकळ्या वेचून घे..

बिजलेली आसवे झेलून घे…

सुख दुःख झोळीत साठवून घे…

आता उधळ हे सारे आकाशी ..

नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,

पेन म्हणजे तुमचा हात आहे..

आता तुमच्याकडे नव्या वर्षाची

सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नव वर्षाच्या या शुभदिनी..!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com