Happy Republic Day 2025 Wishes: प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीच्या रंगात रंगून जा, अन् आपल्या प्रियजनांना द्या 'या' प्रेरणादायी शुभेच्छा...
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताने भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यामुळे आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तसेच त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे कलम, कायद्याचे पालन करून देशात शांतता सुव्यवस्था राखता येते. यादरम्यान संपुर्ण देशभरात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने सर्व देशवासीय हा दिवस अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा करतात. शाळा, महाविद्यालये, इमारती आणि सरकारी, बिगरसरकारी कार्यालयांत तिरंगा फडकवला जातो, तसेच देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याप्रसंगी सोशल मीडिया साईटवर देशभक्तीपर शुभेच्छा, कोट्स, कविता आणि संदेश ठेवून हा दिवस साजरा करा.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहावे
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले...
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय राज्यघटन जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे सदा ठेवूया भान
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यांनी भारतदेश घडविला
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!