Teachers day Wishes 2025 : शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा
Teachers Day Wishes in Marathi 2025 : भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन देशभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तुम्हीही 'या' शुभेच्छा देऊन खास करू शकतात. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
"आई गुरु आहे,
बाबाही गुरु आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरु आहेत.
आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं
त्या सर्व व्यक्ती गुरु आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम.
आम्हाला शिक्षित करण्यासाठी आपण केलेल्या सर्व कठोर परिश्रमांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले… बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले… रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले… अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"