अशी एक महिला अधिकारी ज्या ऊसतोड कामगारांच्या घरी जाऊन राष्ट्रीय ध्वज तिरंग्याबाबतचे नियम देतायेत पटवून...!
विनोद गायकवाड, दौंड
भारतीय स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रमासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. सर्व देशवासियांना हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे या दौंड तालुक्याच्या खेड्या-पाड्यातील वाड्यावस्त्यावरील अंगणवाडीच्या लाभार्थ्यांपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने घरोघरी तिरंगा,घरोघरी पोषण अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन जनजागृती करत आहेत.
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज घरावर फडकविण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी शिंदे या घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. दौंड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरवात झाली आहे..एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत ज्या योजना राबविण्यात येत आहेत. प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दौंड तहसील कार्यालयात घरोघरी तिरंगा आणि घरोघरी पोषण अभियान उपक्रम आयोजित केला होता..यात अंगणवाडी सेविकांनी बनविलेले विविध प्रकारचे 75 पोषक पदार्थ मांडण्यात आले होते.