Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले की...

Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले की...

महापालिका निवडणुका शहराच्या मूलभूत समस्यांवर व्हायला हव्या, मात्र भाजप जाणूनबुजून समाजात फूट पाडणाऱ्या विषयांवर प्रचार करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महापालिका निवडणुका शहराच्या मूलभूत समस्यांवर व्हायला हव्या, मात्र भाजप जाणूनबुजून समाजात फूट पाडणाऱ्या विषयांवर प्रचार करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्यांची जीभ पुन्हा घसरली. भाजपने पैसा फेक तमाशा देख सुरु केलंय.. हर्षवर्धन सपकाळ यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शहरात पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पैशाच्या जोरावर सगळं झाकण्याचा प्रयत्न सुरू असून, गैरव्यवहार आणि दहशतीला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अजित पवार एकीकडे सत्तेत राहून दुसरीकडे टीका करत असल्याचं सांगत, त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. तसेच भाजप सत्तेच्या अहंकाराला जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

थोडक्यात

हर्षवर्धन सपकाळांची पुन्हा जीभ घसरली..

भाजपने पैसा फेक तमाशा देख सुरु केलंय..

हर्षवर्धन सपकाळ यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य..

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com