ताज्या बातम्या
Harshwardhan Sapkal On CM Devendra Fadanvis : "नथुराम गोडसेंप्रमाणे फडणवीससुद्धा शांत डोक्याने..." सपकाळांनी केली मुख्यमंत्र्यांची तुलना नथुराम गोडसेंसोबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसे सोबत तुलना केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसे सोबत तुलना केली आहे. नथुराम गोडसे याने जशी शांत डोक्याने महात्मा गांधी यांची हत्या केली तसच शांत डोक्याने देवेंद्र फडणवीस भांडणे लावतात.