ताज्या बातम्या
Harshwardhan Sapkal : “औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केलं. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत."
"ते कायम धर्माचा आधार घेतात. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे." असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.