लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; क्रीडा मंत्र्यांनी दिला राजीनामा

लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; क्रीडा मंत्र्यांनी दिला राजीनामा

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकाने हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकाने हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून गुन्हा दाखल केला आहे. मंत्र्यांनी यापुर्वीच हे आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले होते आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी क्रीडामंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; क्रीडा मंत्र्यांनी दिला राजीनामा
पेशवाईचा वसा अन् वारसा चालवणारी माणसं सरकारमध्ये : अंधारे

पीडिता म्हणाल्या की, संदीप सिंगने त्यांना आधी जिममध्ये पाहिले होते. नंतर त्यांच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. व मंत्री त्यांना भेटण्याचा आग्रह करू लागले. ते म्हणाले, संदीप सिंगने मला इंस्टाग्रामवर मेसेज केला की माझे राष्ट्रीय क्रीडा प्रमाणपत्र प्रलंबित आहे आणि त्यांना या संदर्भात भेटायचे आहे. यानंतर पीडिता आवश्यक कागदपत्रे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानीमधील ऑफिसमध्ये गेली होती. तिथे गेल्यावर मंत्र्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेना केला आहे.

ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकाने विरोधी पक्ष इंडियन नॅशनल लोक दलच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडे संरक्षणाची मागणी केली होती. मनोहर लाल खट्टर सरकारने संदीप सिंग यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि विशेष चौकशी स्थापन करावी. प्रकरणाची चौकशी करा. एक टीम तयार करावी.

पीडितेचे आरोप संदीप सिंग यांनी फेटाळले आहेत. ते म्हणाले की, माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांची सखोल चौकशी होईल. व अहवाल येईपर्यंत मी क्रीडा खाते मुख्यमंत्र्यांकडे सोपवतो, असे संदीप सिंग यांनी म्हंटले आहे.

कोण आहेत संदीप सिंग?

संदीप सिंग हे व्यावसायिक फील्ड हॉकी खेळाडू आहे. ते भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचे कर्णधारही होते. संदीप सिंह कुरुक्षेत्रातील पेहोवा येथून भाजपचे आमदार आहेत. 2018 मध्ये संदीप सिंग यांच्यावर आधारित बायोपिकही रिलीज झाला होता. याचे शीर्षक होते 'सूरमा'. यामध्ये लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने आपली भूमिका साकारली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com