बातम्या
Thackeray vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. रेबिया प्रकरणाच्या पात्रतेवर आज सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
गेल्या आठवड्यात हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न देता याच खंडपीठासमोर सुनावणी चालेल, असे न्यायालयाने म्हटले होते.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करत आहे.
मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली होती आणि त्यानंतर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यायचं की नाही, याबाबत न्यायमूर्तींनी आपले मत नोंदवलं होतं. त्यानंतर आता या आठवड्यात सलग तीन दिवस घटनापीठ सुनावणी घेण्यात येणार आहे.