Prashant Koratkar : कोरटकरांच्या जामिनावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी, वकील असीम सरोदे काय म्हणाले ?
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. जातीय तेढ,धार्मिक भावना,महापुरुषांचा अवमान आशा एकूण सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचपार्श्वभूमिवर कोरटकरांच्या जामिनावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी झाली आहे. राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असे मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर कोर्टाला निर्देश दिले. कोरटकरांनी अनेक गोष्टी भ्रष्ट मार्गाने केल्या आहेत असं वकील सरोदे यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत कोरटकर यांनी जातीवाद आणि धमकी दिल्याचं ही स्पष्ट मत सरोदे यांनी केल आहे.
पुढे सरोदे म्हणाले की, "कोरटकरने डेटा डिलीट करून मोबाईल पोलिसांना दिला. त्याला पोलिसांनी आतापर्यंत अटक करायला हवी होती. पण, अजूनही तो पोलिसांसमोर हजर राहिलेला नाही. प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकाराने इंद्रजीत सावंत यांच्यासोबत जे वक्तव्य केले ते व्हायरल झाले आहे. त्याची भाषा जातीत तेढ निर्माण करणारी आहे".
"अशा आरोपीला जामीन मिळाला ही आश्चर्याची गोष्ट होती, आणि त्यामुळे राज्य सरकारने याचिका दाखल केली. आज कोल्हापुरातील कोर्टात पुढील सुनावणी आहे. न्यायमूर्तींनी त्याच्यावरील दोन अटी वाचून दाखवल्या. आरोपीने मोबाईल पत्नीच्या हाती दिला, पण तो फॉर्मेट केला. म्हणजे पुरावे नष्ट करण्याचे काम केले आहे", असं असीम सरोदे म्हणाले आहेत.