ताज्या बातम्या
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान प्रकरण; राहुल गांधींवरील सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता विशेष न्यायालयात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता विशेष न्यायालयात होणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता ‘एमपी एमएलए’ या विशेष न्यायालयात होणार आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी.
यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय नुकतेच स्थापन करण्यात आले आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.