संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी

संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.

राऊत यांना सोमवारी 5 सप्टेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर बुधवारी ७ सप्टेंबरला राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती.

राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका; औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com