महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नबाम रेबिया खटल्याचा निकाल ती या प्रकरणाला लागू करावी अशी मागणी केली. राज्यपालांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. शिवसेनेच्या फुटीवर निर्णय घेणं हा मोठा कठिण संवैधानिक मुद्दा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने मौखिकरित्या म्हटलं. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबण्याची किंवा लार्जर बेंचकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. काल शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या मध्येच हस्तक्षेप करत शिंदे गटाच्या वकिलांचा मुद्दा काढण्याचा प्रयत्न केला. आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.