ताज्या बातम्या
मुंबईसह ठाणे, कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईसह ठाणे, कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून मुंबईतील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
सोमवारी तापमान उच्चांकी 38.4 अंशांवर होते. त्यामुळे आता मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.