भंडारा जिल्हात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले

भंडारा जिल्हात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले

भंडारा जिल्हात मुसळधार पाऊस
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सरवर शेख, भंडारा

भंडारा जिल्हात मुसळधार पाऊस सुरु झाला असून गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणांचे 33 पैकी 21 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आली असुन त्यातून 84951 लिटर म्हणजे 3500 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव येथील नाल्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com