मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, विधानभवन परिसरातील शेड कोसळलं

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, विधानभवन परिसरातील शेड कोसळलं

आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाची मुंबई शहरात पहाटेपासून दमदार हजेरी लावली.पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर कालपासून पावसाने जोर धरला आहे.

विधानभवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या शेडला बसला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडवरील काहीसा भाग पडला होता. त्यानंतर पुन्हा शेड बांधण्यात आलेलं आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. येलो अलर्टही देण्यात आला आहे.

मुंबईतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com