मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. सेनगाव शहरात पुरात वाहून गेलेल्या 7 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.
लहान चिमुकल्यांसह सहा जणांना रेस्क्यू टीमने वाचवले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 12 जनावरांचा मृत्यू झाला असून किनवट, हिमायतनगरमध्ये पावसामुळे 25 घरांची पडझड झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच आता राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा देखिल देण्यात आला आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)