बातम्या
'या' राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाट पसरली आहे.
देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाट पसरली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवारी म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादळाचा परिणाम दिसून येत आहे.
याचपार्श्वभूमीवर आता पूर्व भारतात उष्णतेची लाट येऊ शकते तर ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली -एनसीआरसह पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.