Rain Alert : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Rain Alert : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस असून वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे मुंबईत पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याचा लावला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस असून वातावरण ढगाळ झाले आहे. दक्षिण मुंबईत पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याचा लावला आहे. त्याचसोबत दादर, परळ,वरळी आणि मुंबईच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. ठाणे आणि पालघर मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. पुढील 3 तासासाठी हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यासोबत पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क हिंजवडी झाला आहे. फक्त काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com