Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

बीडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला आहे, बीडमध्ये 44 जण अडकले आहेत.
Published by :
Team Lokshahi

बीडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक, घाटा पिंपरी 7 लोक, पिंपरखेड 6 लोक, धानोरामध्ये 3 आणि डोंगरगण मध्ये 3 असे लोक अडकलेले आहेत. एकूण 6 गावात 44 लोकं अडकलेली आहेत .

जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार, नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हॅलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पुणे येथुन एनडीआरएफ ची टिम बीड येथे पाठविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com