Dharashiv:धाराशिवच्या वालवडमध्ये अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान

तालुक्यातील वालवड गावात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

धाराशिव तालुक्यातील वालवड गावात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुधना नदीच्या पूर्वेकडे अर्धा किलोमीटर तर पश्चिमेकडे एक किलोमीटर परिसरात पाण्याचा जोरदार प्रवाह झाल्याने उभी पिके वाहून गेली. अनेक जमिनी खचून गेल्या असून शेतकरी भातड पडल्याची हळहळ व्यक्त करत आहेत.

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वालवडला भेट देणार आहेत. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून चर्चा करतील .

Summary

पुरामुळे गावातील रस्ते वाहून गेले, संपर्क तुटला आणि शेतकऱ्यांना हालभोगावे लागत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीसोबतच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की योग्य मदत आणि भरपाईशिवाय पुढील हंगाम कसा सुरू करायचा? हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com