Helicopter Crash : एअरलेक विमानतळाजवळ हेलिकॉप्टर अपघात, सर्वांचा मृत्यू
थोडक्यात
मिनेसोटाच्या ट्विन सिटीज येथे धक्कादायक घटना घडली आहे.
एअरलेक विमानतळाजवळ एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून सर्वांचा मृत्यू झाला आहे.
विमान रॉबिन्सन R66 होते आणि ते जमिनीवर आदळल्याने त्यांने पेट घेतला
शनिवारी दुपारी मिनेसोटाच्या ट्विन सिटीज परिसरातील एअरलेक विमानतळाजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कोणतीही जीवितहानी टळली नाही. स्थानिक प्रशासनाने माहिती दिली की दुर्घटनाग्रस्त विमान रॉबिन्सन R66 होते आणि ते जमिनीवर आदळताच पेटले. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्कालीन पथकांना हेलिकॉप्टर जळून खाक झालेलं आढळलं.
पोलिसांच्या माहितीनुसार अपघात निवासी किंवा व्यावसायिक क्षेत्रात घडलेला नसल्यामुळे जमिनीवर कुणालाही इजा झाली नाही. मात्र, अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती प्रवासी होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. रॉबिन्सन R66 हे सिंगल-इंजिन टर्बाइन हेलिकॉप्टर असून त्यामध्ये एका पायलटसह चार प्रवासी बसू शकतात.
नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या निवेदनानुसार, हेलिकॉप्टर "अज्ञात कारणास्तव कोसळले आणि त्यानंतर आग लागली." रविवारी एक तपास अधिकारी मिनेसोटाला पोहोचून घटनास्थळाची पाहणी करणार असून अवशेष नोंदवून पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहेत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) यांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. FAA आणि NTSB मिळून या दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास करणार आहेत.