Amravati Ganpati Visarjan : अमरावतीत गणपती विसर्जनाला गालबोट; 2 वेगवेगळ्या घटनेत नदीत बुडून दोघांचा मृत्यू

अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन ठिकाणी गालबोट लागले आहे.
Published by :
Prachi Nate

अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन ठिकाणी गालबोट लागले आहे. नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी 32 वर्षीय तरुणी मुक्ता श्रीनाथ या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने मृत्यू झाला.

तर दुसऱ्या घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे 22 वर्षीय युवक करण चव्हाण गणपती विसर्जनच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला ज्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com