हॅलो ... कोळसेवाडी बाजारपेठेतील कचराकुंडीत बॉम्ब आहे; अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

हॅलो ... कोळसेवाडी बाजारपेठेतील कचराकुंडीत बॉम्ब आहे; अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

हॅलो ....कोळसेवाडी बाजारपेठेत कचरा कुंडीमध्ये बॉम्ब आहे आजूबाजूला लहान मुलं,माणसं आहेत लवकर या ......
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमजद खान, कल्याण

हॅलो ....कोळसेवाडी बाजारपेठेत कचरा कुंडीमध्ये बॉम्ब आहे आजूबाजूला लहान मुलं,माणसं आहेत लवकर या ......असा फोन करत पोलिस यंत्रणेस वेठीस धरनाऱ्या एका माथेफिरू तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.

दरम्यान कोळशेवाडी बाजारपेठेत कचराकुंडी मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. हा कॉल आल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने तत्काळ कोळशेवाडी बाजारपेठ परिसरात धाव घेत कचराकुंडी जवळ शोध घेतला. अवघ्या काही मिनिटातच ही अफवा असल्याचे समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास सोडला .

सदर कॉल ट्रेस करत पोलिसांनी अफवा पसरवल्या प्रकरणी निलेश फड या 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com