Hema Malini : ‘हे अत्यंत बेजबाबदार..’; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनी यांचा संताप, म्हणाल्या...
थोडक्यात
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनी यांचा संताप
(Dharmendra ) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे माहिती सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.
मात्र त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. अशातच आता हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे. हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘जे काही घडतंय ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे त्यांच्याबद्दल अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
