छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आता महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीचे भुजबळ साहेब जेष्ठ नेते आहेत. म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे जे सर्वच मित्रपक्ष आहेत त्या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी, त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं. यासाठी आपण विनंती केलेली आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जरी वेळ कमी असला तरी आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेले 10 वर्षापासून आहोत. आचारसंहितेच्या अगोदरदेखील आपण विकासकामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरुन आलो.

म्हणून प्रचार महायुतीचा याठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय यांची ताकद देखील मोठी आहे. सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं त्याठिकाणी यश मिळेल. भुजबळ साहेब सहभागी झाल्यानंतर निश्चितच एक मोठी ताकद आता महायुतीला या ठिकाणी मिळालेली आहे. असे हेमंत गोडसे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com