Henipavirus
Henipavirus Team lokshahi

नवीन Henipavirus ची लक्षणे कोरोनापेक्षा किती वेगळी, त्यावर काय उपचार

ही लक्षणे Henipavirus बाधित रूग्णांमध्ये आढळून आली
Published by :
Shubham Tate

henipavirus symptoms : कोरोना विषाणूची भीती जगातून अद्याप संपलेली नाही, त्याच दरम्यान चीनमध्ये एका नवीन विषाणूने दार ठोठावले आहे. तापाने त्रस्त असलेल्या काही लोकांच्या तपासणीत त्यांना हेनिपा विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. Henipavirus ला Langya Henipavirus या नावाने देखील ओळखले जाते. आरोग्य तज्ज्ञांनी या विषाणूचे वर्णन प्राण्यांपासून होणारा विषाणू असे केले आहे. सध्या या विषाणूवर कोणतीही लस नाही आणि त्यावर कोणताही उपचार नाही, असेही सांगण्यात आले आहे. (henipavirus symptoms and coronavirus symptoms difference)

चीनच्या पूर्वेकडील शेडोंग आणि हैनानमध्ये 35 लोकांच्या घशातील नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये नवीन विषाणू हेनिपाव्हायरसची माहिती समोर आली आहे. ताप, खोकला, स्नायू दुखणे, उलट्या, डोकेदुखी यासह इतर समस्या हेनिपाव्हायरसची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर हेनानच्या सान्या शहरातील हवाई सेवा, रेल्वे सेवा आणि बाजारपेठा आठवडाभरासाठी बंद करण्यात आल्या आहेत. लोकांची कोरोना तपासणीही केली जात आहे. कोविड धोरणाबाबत चीन कठोर पावले उचलत आहे.

Henipavirus
Asia Cup 2022 : पांड्या धडाकेबाज खेळी करणार, साक्ष देणारी आकडेवारी

ही लक्षणे Henipavirus बाधित आढळून आली

तापाची समस्या हेनिपाव्हायरसची लागण झालेल्यांमध्ये दिसून आली आहे. यासोबतच खोकला, स्नायू दुखणे, उलट्या होणे, डोकेदुखीच्या तक्रारी रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. या विषाणूवर कोणताही उपचार नसल्यामुळे संसर्ग झालेल्यांवर लक्षणांच्या आधारे उपचार केले जात आहेत. तसेच, हा विषाणू घातक आणि गंभीर नाही असे वर्णन केले आहे.

दुसरीकडे, कोरोना बाधितांमध्येही ताप, खोकला, तीव्र स्नायू दुखण्यासोबतच चव आणि वास कमी होत असल्याच्या तक्रारी होत्या. या प्राणघातक विषाणूने जगभरातील कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना बाधितांना आयसोलेशनमध्ये ठेवले जात असताना, हेनिपाव्हायरस बाधितांबाबत अशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत.

Henipavirus
रशियाने युक्रेनवर मध्यरात्री केला गोळीबार, 21 नागरिकांचा मृत्यू

हेनिपाव्हायरससाठी कोरोनाची लस उपलब्ध नाही

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगभरात अनेक कोरोना लस तयार करण्यात आल्या आहेत. कोट्यावधी कोरोनाचे डोसही लोकांना देण्यात आले आहेत. परंतु सध्या Henipavirus साठी कोणतीही लस उपलब्ध नाही.

Henipavirus प्राणघातक नाही

ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूलचे प्रोफेसर वांग लिनफा यांनी नवीन विषाणूबद्दल सांगितले आहे की, हा जीवघेणा आणि गंभीर नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु आपण पाहिले आहे की निसर्गात उपस्थित असलेले अनेक विषाणू कोरोना विषाणूसारखे मानवांना संक्रमित करताना अनपेक्षित परिणाम करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com