हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

ईडीकडून हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरु आहे.

हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली गेली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com