Maharashtra Weather Report : उन्हाळ्यात हील स्टेशन झाली हीट स्टेशन; तापमान बघाल तर फुटेल घाम

Maharashtra Weather Report : उन्हाळ्यात हील स्टेशन झाली हीट स्टेशन; तापमान बघाल तर फुटेल घाम

महाराष्ट्र तापमान: थंड हवेची ठिकाणे झाली उष्ण, उन्हाळ्यात वाढले तापमान
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रामध्ये उन्हाळाचा पार दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. सध्या शाळांना सुट्टी पडलेली असताना अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. परंतू यंदा मात्र थंड हवेची ठिकाणे थंड राहिली नाही. याचा पारा चांगलाच वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे म्हटलं की लक्ष जाते ते महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान अशा ठिकाणांकडे लक्ष जाते, पण यंदा या थंड हवेच्या ठिकाणीवर उष्णची लाट पसरली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील 'हिल स्टेशन्सची वाटचाल हीट स्टेशन्सकडे' सुरु आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात या ठिकाणांचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळ्याचे तापमान सोमवारी 38 अंश सेल्सियस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्याबरोबरच इगतपुरी, तोरणमाळ येथे 39.00 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

मुंबई- पुणे पर्यटकांना जवळ असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर आहे. परंतू आता त्याच महाबळेश्वरचे तापमान 33.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. त्यासोबतच पाचगणीचे तापमान 34 अंशावर गेले आहे. 'येवा कोंकण आपलोच आसा...'असे आपण नेहमीच ऐकतो. त्याच कोकणाचे तापमान आता 35 अंशावर येऊन पोहचले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com