Heena Gavit : हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या...

Heena Gavit : हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या...

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. आज हिना गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिना गावित म्हणाले की, माझा विश्वास आहे की या आपल्या आज होत असलेल्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी ही वाढेल आणि तिसऱ्यांदा पुन्हा देशात मोदीजींचे हॅट्रीक होणार आणि नक्की नंदुरबारमध्ये पुन्हा लोक मला मतदान करुन तिसऱ्यांदा माझंही हॅट्रीक होईल असा विश्वास मला आहे.

पहिली महिला खासदार या मतदारसंघाची म्हणून मला हा बहुमान या मतदारसंघाच्या लोकांनी, जनतेनं मला आशीर्वाद देऊन पहिली महिला खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये पाठवले. या गोष्टीची मला पूर्णपणे जाणीव आहे. म्हणून मी आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये महिलांसाठी विशेष करुन मी अनेक योजना राबवल्या. महिलांचा प्रचंड विश्वास, प्रचंड मोठा आशीर्वाद हा माझ्या मागे आहे. म्हणून आज आपल्याला मतदानामध्येसुद्धा महिलांची टक्केवारी मतदानाची ही वाढलेली पाहायला मिळते आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाले की, मोदीजी हे आज आंतरराष्ट्रीय नेते आहेत. मोदीजींची जेव्हा सभा नंदुरबारमध्ये झाली आजपर्यंत नंदुरबारच्या इतिहासामध्ये एवढे लोक एखादा राजकीय सभेला आलेलं आजपर्यंत हे घडलेलं नाही. लाखो लोक मोदीजींची सभा ऐकण्यासाठी आले होते. लोकांमध्ये मोदीजींबद्दलचा एक आदर त्या सभेमध्ये आम्ही पाहिलं. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की लोक मोदीजींना पुन्हा 400पार करण्यासाठी नंदुरबार मतदारसंघाची जनता ही सज्ज झालेली आहे. मोदीजींना 400पार करत असताना त्यामध्ये नंदुरबारचा समावेश व्हावा असं जनतेमध्ये एक उत्साहीमय वातावरण बघून वाटतं आहे. असे हिना गावित म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com