यंदाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला; पुण्याचा अभिजीत कटके विजयी

यंदाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला; पुण्याचा अभिजीत कटके विजयी

हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अभिजीतच्या विजयामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणाच्या सोनूवीर आणि महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेमध्ये रंगला. मात्र अभिजीतने यात विजय मिळवला. तेलंगणामध्ये ही हिंद केशरी स्पर्धा पार पडली.

अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता.

अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय (51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -2023) आयोजित केली होती. कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com