नाशकात आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासले; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
Admin

नाशकात आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासले; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नाशिकमध्ये आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिकमध्ये आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय. आंतरधर्मीय विवाह लावल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. दरम्यान शहरातील प्रसिद्ध पुरातन मंदिराच्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासून हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त केलाय.

एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लीम मुलाशी लावून दिलं आहे. या पुरोहिताने काहीशा पैशांसाठी असे काम केलं असल्याचे समजते. या मुलीचं वय 18 वर्ष आहे. तर मुलाचं वय 30 वर्ष आहे. तरीही पुरोहिताने त्यांचे लग्न लावून दिलं आहे. बेकायदेशीररित्या हा विवाह लावण्यात आला आहे, असा आरोप हिंदुत्तवादी संघटनानी केला आहे. आंतरधर्मीय विवाह लावणाऱ्या पुरोहिताच्या तोंडाला काळं फासून हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com