LPG Gas Price Cylinder Hike
LPG Gas Price Cylinder Hike

महागाईचा फटका; LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला

महागाई वाढतच चालली आहे.

महागाई वाढतच चालली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तसेच दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत.

घरगुती सिलेंडर दर

दिल्लीत 1103 रुपये

मुंबईत 1102.50 रुपये

कोलकातामध्ये 1129 रुपये

चेन्नईमध्ये 118.50 रुपये

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com