महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर
थोडक्यात
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर
आंबेडकर अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
6 डिसेंबरला मुंबईतील शाळा-महाविद्यालयं बंद राहणार
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात.
याच पार्श्वभूमीवर या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 6 डिसेंबरला मुंबईतील शाळा-महाविद्यालयं बंद राहणार आहेत. यासोबतच चैत्यभूमी-दादर-वरळी परिसरात 2 दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
या दिवशी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली असून मुंबई शहर व उपनगरातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, महानगरपालिकेची कार्यालये, बँका बंद राहणार आहेत.