लखनऊ : हॉटेलला भीषण आग; खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना काढताहेत बाहेर

लखनऊ : हॉटेलला भीषण आग; खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना काढताहेत बाहेर

अग्निशामक दलाकडून युध्दपातळीवर बचावकार्य सुरु

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका हॉटेलला येथे आज भीषण आग लागली आहे. या हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले आहेत. या घटनेची माहिती समजताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचले असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. अडकलेल्या लोकांना हॉटेलच्या काचा फोडून बाहेर काढण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हजरतगंज येथील हॉटेल लेवानामध्ये भीषण आग लागली आहे. या हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्याने हॉटेलच्या काचा फोडून बाहेर लोकांना काढण्यात येत आहे. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा कर्मचारी ऑक्सिजन मास्क घालून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

घटनास्थळी तीन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत. आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com