'Housefull 5' Box Office Collection: 'Housefull 5' ची जबरदस्त ओपनिंग, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

'Housefull 5' Box Office Collection: 'Housefull 5' ची जबरदस्त ओपनिंग, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

'हाऊसफुल 5': अक्षय कुमारच्या नवीन चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग.
Published by :
Team Lokshahi
Published on

चित्रपट विश्वातील बहुचर्चित ,अक्षय कुमार Akshay Kumar, नाना पाटेकर Nana Patekar, अभिषेक बच्चन Abhishek Bachchan अश्या तगड्या स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल Housefull 5 5' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत मोठा गल्ला जमा केला आहे. हाऊसफुल 5' हा चित्रपट 6 जून रोजी जगभरातील चित्रगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

'Housefull 5' Box Office Collection: 'Housefull 5' ची जबरदस्त ओपनिंग, जमवला इतक्या कोटींचा गल्ला
Prasad Oak : अभिनेते प्रसाद ओक यांचा गौरव ; 'निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025' जाहीर

साजिद नाडियाडवाला Sajid Nadiadwala यांनी निर्मित केलेला आणि तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेला "हाउसफुल 5" च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनं अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर 2Kesari Chapter 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला ही मागं टाकलं आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास 23 कोटींच्या घरात कमाई केली आहे.प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपलं वर्चस्व दाखवत मोठी कमाई केली आहे. हाऊसफुल 5' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पहिल्या वीकेंडला आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दुहेरी मीनिंग डायलॉग आणि भरपूर वेडेपणासह, अक्षयने पुन्हा दमदार एन्ट्री मारत बॉक्स ऑफिस वर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'हाऊसफुल 5A' आणि 'हाऊसफुल 5B'म्हणजे एका सिनेमाचे दोन वेगवेगळे शेवट असणारा हा चित्रपट आहे. सिनेगृहात गेलेल्या दोन स्क्रिन Two Screenमध्ये दोन वेगळे क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.अक्षय कुमारच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला 'फुल टू एंटरटेनिंगfull To Enteriment' म्हटलं आहे, तर काहींनी टीका केली आहे.

एका प्रेक्षकाने म्हटलं आहे की, नॉन-स्टॉप हसणं, सस्पेन्स. लोकांच्या या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी एकुणच कॉमेडी थ्रिलर Comedy Thriller चा संगम असलेला चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार Akshay Kumar आणि रितेश देशमुख Riteish Deshmukh यांच्यासोबत अभिषेक बच्चनAbhishek Bachchan, जैकलीन फर्नांडिस Jacqueline Fernandez, सोनम बाजवाSonam Bajwa, नरगिस फाखरी Nargis Fakhri, संजय दत्त Sanjay Dutt, जॅकी श्रॉफ Jackie Shroff आणि नाना पाटेकर Nana Patekar यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कमल हासन Kamal Haasan यांच्या 'ठग लाइफ Thug Life' चित्रपटानंतर 'हाऊसफुल 5 Housefull 5' प्रदर्शित झाला आहे मात्र Housefull 5 च्या धमाकेदार सुरुवातीमुळे आता 'ठग लाइफ' चित्रपट मागे पडल्याचं चित्र आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com