Housefull 5 Review : 'या' सुपरस्टार कलाकारानं स्वतःच घेतला आपल्या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू; ओळखू नये म्हणून केला मास्क परिधान
चित्रपट विश्वातील बहुचर्चित ,अक्षय कुमार Akshay Kumar, नाना पाटेकर Nana Patekar, अभिषेक बच्चन Abhishek Bachchan अश्या तगड्या स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल Housefull 5 5' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत मोठा गल्ला जमा केला आहे. हाऊसफुल 5' हा चित्रपट 6 जून रोजी जगभरातील चित्रगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
साजिद नाडियाडवाला Sajid Nadiadwala यांनी निर्मित केलेला आणि तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेला "हाउसफुल 5" च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनं अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर 2Kesari Chapter 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला ही मागं टाकलं आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास 23 कोटींच्या घरात कमाई केली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपलं वर्चस्व दाखवत मोठी कमाई केली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घालत असतानाच, खुद्द अभिनेता अक्षय कुमारने आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मैदानात उतरला आहे. अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एका किलरचा मुखवटा घालून लोकांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र लोकांनी त्याला ओळखलेही नाही.
या संदर्भातील व्हिडिओ अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम हँडल Instgram handle वर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार किलरचा मुखवटा घालून नेटिझन्सना त्यांच्या प्रतिक्रिया विचारताना दिसत आहे. अनेकांनी चित्रपटाला शानदार असल्याचे म्हटले आहे.. मात्र कोणीही अक्षय कुमारला ओळखले नाही.