Mahashivratri : महाशिवरात्री कशी साजरी करावी त्यांचे महत्त्व काय? जाणून घ्या..
माघ महिन्यात 'महाशिवरात्र' साजरी केली आहे. महाशिवरात्री दिवशी अनेक भक्त उपवास धरतात. या दिवशी शिवमंदिरात जाणे शुभ मानले जाते. परंतु महाशिवरात्र का साजरी केली जाते? उपवास का केला जातो?, शिवलिंगाची पूजा कशी करावी? याबद्दलची सर्व माहिती या लेखात जाणून घेऊया.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. शिवपुराणाच्या कथेनुसार, महिन्याच्या कृष्णापक्षातील चतुर्दशीला भगवान शंकर शिवलिंगाच्या रुपात प्रकट झाले. तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसरीकडे असे म्हटले जाते की, यादिवशी महादेव आणि माता पार्वती तिचा लग्न सोहळा पार पडला होता.
महाशिवरात्रीचा उपवास का केला जातो?
अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. उपवास केल्याने सर्व इच्छा पुर्ण होतात आणि कामांमध्ये यश मिळते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जळ व्रत किंवा फळांचे सेवन असे दोन प्रकारचे व्रत केले जाते. या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनाने केली जाते.
कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत?
या उपवासामध्ये विविध प्रकारच्या फळांचे सेवन करु शकता. तसेच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा उपवासाच्या दिवशी खाऊ शकता. त्याशिवाय मखाना खीर किंवा भाजलेला मखाना, दूध, दही आणि चीज, सुकामेवा खाऊ शकता. तसेच या दिवशी गहू, तांदूळ आणि इतर धान्ये खाऊ नयेत. तसेच कांदा, लसूण, मुळा, वांगी, मांस, मासे यापदार्थाचे सेवन करु नये.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा कशी करावी?
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा महत्त्वाची मानली जाते. सकाळी स्नान करुन सूर्यदेवाला जल अर्पण करावे. दही, दूध, मध, तूप आणि गंगाजल मिसळून शिवलिंगाला अभिषेक घालावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, फळे आणि सुपारी अर्पण करावी. तसेच तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी. त्यानंतर गाईचे दूध, दही, तूप आणि मध, साखर मिसळून पंचामृत तयार करावे. शिवमंत्राचा जप करत शिवलिंगावर पंचामृत अर्पण करत दूध आणि धान्य मिसळलेला नैवेद्य भगवान शंकराला अर्पण करावा.