HR Excellence Award :"एचआर एक्सलन्स" पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

HR Excellence Award :" पीबीएस एचआर एक्सलन्स" पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

पीसीईटी आणि पीसीयूचे एचआर एक्सलन्स पुरस्कार सोहळा: 500 पेक्षा जास्त कंपन्यांमधून 140 प्रवेशिका परीक्षकांकडे देण्यात आल्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित, पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू PCU) आणि पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस PBS) वतीने "एचआर एक्सलन्स HR Excellence पुरस्कार - 25" सोहळा शनिवारी (दि. 14) बालेवाडी येथे पार पडला. यावेळी पीसीसीओईचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील Chancellor Harshvardhan Patil, फाउंडेशनचे फिरोज पुनावाला Feroz Poonawalla of the Foundation, कोरियन असोसिएशन Korean Association चे भारतातील प्रतिनिधी एडगर ली, निरंतरा इकोचे प्रसन्न राव, महाराष्ट्र इकॉनोमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन इटकर, , उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ शीतलकुमार रवंदळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी, आशिष गाकरे आदी उपस्थित होते.

उद्योग व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात 'एचआर HR'ची भूमिका आव्हानात्मक असते. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक समस्या, प्रश्नांचा विचार करुन अचूक निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन नियमित गतीने सुरू ठेवणे शक्य होते, असे मत पुनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री डॉ. लीला पुनावाला यांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही उद्योग व्यवसायाचा आत्मा म्हणजे एचआर विभाग असतो. व्यवसाय वृद्धीसाठी एचआर अधिकाऱ्यांची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करणे; प्रसंगी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या बाबतीत एचआरची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम एचआर प्रतिनिधी करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे एचआरच्या कामात बदल झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन कामकाजात केला पाहिजे. ज्ञान कक्षा उंचावण्यासाठी आपल्याकडील ज्ञान सहकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे फिरोज पुनावाला यांनी सांगितले. यावेळी एडगर ली, प्रसन्न राव, सचिन इटकर, जया लक्ष्मी, प्रज्ञा कुलकर्णी प्रदीप गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यास विविध कंपन्यांमधील 300 पेक्षा जास्त एचआर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. एचआर एक्सलन्स पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 500 पेक्षा जास्त राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमधून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रथम छाननी नंतर 140 प्रवेशिका परीक्षक मंडळाकडे देण्यात आल्या. यामधून 60 जणांची निवड परीक्षकांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे असे डॉ. गणेश राव यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार डॉ. मिनाक्षी त्यागी मानले.

परीक्षक मंडळामध्ये अमृता खर्डेकर (मास्टरकार्ड), जया लक्ष्मी (गुगल), अभिषेक कुमार (निल्सन आय क्यू), मेघा जशनानी (नॅशडॅग), प्रज्ञा कुलकर्णी (टेलस्ट्रा इंडिया), प्रवीण गांधी (टाटा टेक्नॉलॉजी), समिताभ रॉय (इंडिया अँड पिलीपिन्स फायनान्सियल सोल्युशन्स), राजेश कुमार सिंग (केपीआयटी), डॉ. राजेंद्र हिरेमठ (भाऊ इन्स्टिट्यूट इनोव्हेशन), हेमंत सेठीया (एचआर अँड टीए लीडर), शोभा पांडे (जॉन डियर), डॉ. सदाशिव पाध्ये (किर्लोस्कर न्युमॅटिक), सुकन्या पटवर्धन (माईंड ब्युटिक) आकांक्षा साने (एस. जी. एनॉलिटिक्स), पूजा गांधी (सीनियर एचआर लीड) या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांमधील ६० एच आर लीडर्सला यावेळी "एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड - २५" देऊन गौरविण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com