ताज्या बातम्या
Best of luck! राज्यात आजपासून बारावीची परीक्षा
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई विभागातून नियमित 325571 विद्यार्थ्यांसह एकूण 342012 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
यासोबतच कॉपी आढळणाऱ्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा हा महत्वाचा निर्णय असून परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात 271 भरारी पथके असणार आहेत. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे.