HSRP Number Plate Date Extension :
HSRP Number Plate Date Extension : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत राज्य सरकारकडून मुदतवाढHSRP Number Plate Date Extension : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत राज्य सरकारकडून मुदतवाढ

HSRP Number Plate Date Extension : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत राज्य सरकारकडून मुदतवाढ

HSRP नंबर प्लेट: महाराष्ट्र सरकारने 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली. अंतिम मुदतवाढ!
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्र शासनाने 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवली आहे. ती 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे की, ही मुदत अंतिम असून त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. HSRP पाटी बसवण्यासाठी ही तिसऱ्यांदा मुदत वाढ केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना पुरेसा वेळ मिळणार आहे.

महाराष्ट्र परिवहन विभागाने सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबर प्लेट सक्तीचे केले आहे. या सर्व गाडी मालकांना 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र तिसऱ्यांदा आता यामध्ये मुदतवाड करण्यात आलेली आहे. वाहनांचे नंबर प्लेट बदलून न झाल्यामुळे ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी फक्त 23 लाख वाहनांची नंबर प्लेट बसवण्यात आली आहे 40 लाख वाहन धारकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे मात्र तरीही एक कोटी वाहन धारकांनी अजूनही ऑनलाईन नोंदणी केलेली नाही.अनेक वाहनचालकांनी कंपन्यांकडून या पाट्या मिळण्यास खूप उशीर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच काही फिटमेंट केंद्र सुद्धा बंद झाल्यामुळे होणारा पुरवठा हा खूप धीम्या गतीने चालू आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत वाढ केली आहे.

मात्र यासाठी सर्व वाहन मालकांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ही नंबर प्लेट बसवण्याकरता अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे 15 ऑगस्ट नंतर ज्या वाहनांवरती ही नंबर प्लेट नसेल त्या वाहनांवर वायू वेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. मात्र 15 ऑगस्ट पूर्वी ह्या प्लेट बसवण्यासंदर्भात तुमचे रजिस्ट्रेशन झाले असेल तर त्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 177 नुसार अनधिकृत प्लेट वापरणाऱ्यांना १५ ऑगस्ट नंतर १ हजार रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेली विशेष नंबर प्लेट आहे 2019 नंतरच्या सर्व वाहनांना डीलर कडूनच ही नंबर प्लेट बसवली जाते मात्र जुन्या वाहनांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com