Gold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी
Gold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधीGold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी
Published by :
Team Lokshahi
Published on

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण आज पुन्हा एकदा कायम राहिली आहे. सर्राफा बाजारात आज सोन्याचा दर 365 रुपयांनी तर चांदीचा दर तब्बल 2400 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी गुड न्यूज ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया–युक्रेन युद्ध चर्चेच्या माध्यमातून थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर तणाव कमी झाला असून त्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येत आहे. तणाव शमल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भांडवली बाजाराकडे वळण घेतले असून सोन्या–चांदीवरील गुंतवणुकीत घट झाली आहे. यामुळे दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या आहेत.

गेल्या 8 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याने 101406 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोनं तब्बल 2603 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सर्राफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 365 रुपयांनी घसरून 99168 रुपयांवर आला आहे. जीएसटीसह एका तोळ्याची किंमत 101767 रुपये इतकी झाली आहे. 23 कॅरेट सोनं देखील 365 रुपयांनी घसरून 98407 रुपयांवर आलं असून जीएसटीसह याचा दर 101359 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या तोळ्यात 334 रुपयांची घसरण होऊन तो दर 90504 रुपयांवर आला आहे. जीएसटीसह हा दर 93219 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोनं 274 रुपयांनी स्वस्त होऊन 74102 रुपयांवर आलं आहे.

चांदीच्या दरात मात्र सर्वाधिक घसरण झाली आहे. चांदी तब्बल 2400 रुपयांनी कमी होऊन 111225 रुपये किलोवर आली आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 114561 रुपये इतका झाला आहे. आयबीजेएच्या दरानुसार जीएसटीशिवाय चांदीचा दर 113625 रुपये आहे.

मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरु आणि चेन्नई या शहरांत 22 कॅरेट सोन्याचा तोळा 91800 रुपये तर 24 कॅरेट सोनं 100150 रुपये आहे. नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91950 रुपये असून 24 कॅरेट सोनं 100300 रुपये आहे. अहमदाबाद आणि इंदोर येथे 22 कॅरेट सोनं 91850 रुपये तर 24 कॅरेट सोनं 100200 रुपये तोळा आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 91800 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 100150 रुपये नोंदवण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील वर्षभरात सोन्याच्या दरात एकूण 23063 रुपयांची तर चांदीत 25208 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा एका तोळ्याचा दर 75740 रुपये होता, तर चांदीचा दर 86017 रुपये किलो होता. मात्र आता पुन्हा एकदा दर घसरल्याने खरेदीदारांसाठी हा सुवर्णसंधीचा काळ मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com