Sudhakar Badgujar Nashik : सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश; मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाला इशारा, म्हणाले

नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला आहे.
Published by :
Prachi Nate

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा इन-आऊटचा खेळ सुरू झाला आहे. नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला आहे.

हा प्रवेश केवळ औपचारिक नसून, एकप्रकारचे शक्तिप्रदर्शन ठरला आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात बडगुजर भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी शिवसेना ठाकरे पक्षाला इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com