Dhule Crime News : भयंकर! प्रेयसीसाठी पतीनं पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन संपवलं; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन सैनिक असलेल्या पतीनं मारून टाकलं आहे. पत्नीच्या मृत्युप्रकरणी पतीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane

धुळ्यात प्रेयसीसाठी पतीनं स्वतःच्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन सैनिक असलेल्या पतीनं मारून टाकलं आहे. पत्नीच्या मृत्युप्रकरणी पतीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्यात क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या कपिल बागुल काम करत होते. त्यांचा विवाह पूजा बागुल यांच्यासह 2010 ला झाला होता. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर कपिलचा प्रेमसंबंधाबाबत पत्नी पूजाला माहिती मिळाल्यावर त्यांच्यात वाद निर्माण झाला. अशातच प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सैनिक असणाऱ्या पती कपिल बागुल, सासू विजया बागुल, नणंद, प्रेयसी प्रिया कर्डिले यांनी पूजा वाघूल हिला पकडून पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन मारल्याचा धक्कादायक अहवाल शवविच्छेदनातून समोर आला आहे. पश्चिम देवपुर पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा हिला गुरुवार, 29 मे 2025 रोजी दुपारी कपिल बागुल यांनी पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन तसेच तिच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत करून तिचा मरणास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com