Gunaratna Sadavarte On Chhagan Bhujbal : 'भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिल्याचा मला आनंद' : सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते: छगन भुजबळांना मंत्रिपदाचा आनंद
Published by :
Riddhi Vanne

धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळांना मिळाले आणि त्यांनी मंत्री पदाची शपथदेखील घेतली. आता भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा पदाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

वकील gunaratna sadavarte गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, "आज महाराष्ट्रात आनंदी-आनंद आहे. ओबिसी विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळांना मंत्री केल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्या कारणासाठी भुजबळांना टार्गेट केलं होत. त्यामुळे छगन भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे हे सरकार सर्वांना न्याय देणारे आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com